PHOTO : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

(Photo : PTI)

1/6
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. (Photo : PTI)
2/6
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या पंथ चौक परिसरात गुरुवारी संध्याकाळी चकमक झाली होती. (Photo : PTI)
3/6
जेव्हा एका संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरु केली, त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरु झाला. सुरक्षा दल जसं दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु झाला. (Photo : PTI)
4/6
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला झालेल्या गोळीबारात तीन पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Photo : PTI)
5/6
सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी पुष्टी केली की, दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. (Photo : PTI)
6/6
(Photo : PTI)
Sponsored Links by Taboola