Rahul Gandhi Priyanka Gandhi: भारत जोडो यात्रेत दिसलं बहिण भावाचं निखळ प्रेम; पाहा फोटो
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गांधी कुटुंबियांचे अनेक फोटो पाहायला मिळाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यात्रेत राहुल गांधींसोबत त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी वाड्रा याही सहभागी झाल्या आहेत.
यात्रा गाझियाबादमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि पक्षाच्या इतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि इतर भारत यात्रेचे स्वागत केले.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा सुरू झाली आणि उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे.
यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी स्टेजवर एकत्र बसलेले दिसले.
जिथे राहुल गांधी आणि बहीण प्रियांका यांचा निखळ प्रेम दिसलं.
हे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत काँग्रेसने लिहिले की, ‘भाई-बहिणीचे शुद्ध प्रेम’, या व्हिडीओमध्ये ‘चार दिशाओं जैसी तुम हो...’ हे गाणेही वाजत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात ही यात्रा 5 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
6 जानेवारीला भारत जोडो यात्रा हरियाणात दाखल होईल, जिथे ती 10 जानेवारीपर्यंत राहील. यानंतर ही यात्रा 11 जानेवारीला पंजाबमध्ये प्रवेश करेल आणि 19 जानेवारीला हिमाचल प्रदेशातून एक दिवसासाठी जाईल.