Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मोठं यश, गुजरातमध्ये पहिला बोगदा तयार; पाहा फोटो
याला मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर असेही म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातमधील वलसाड येथील बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये पहिला माउंटन बोगदा तयार करण्यात आला आहे.
यासंदर्भात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने माहिती दिली आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडूनच हे बांधकाम करण्यात येत आहे.
नवीन ऑस्ट्रियन बोगदा पद्धती म्हणजेच एनएटीएमद्वारे बांधला गेला आहे, हा बोगदा तयार करण्यासाठी 10 महिने लागले, अशी माहिती एनएचएसआरसीएलने दिली आहे.
गुजरातमधील वलसाडमधील उंबरगाव तालुक्यातील जरोली गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा बोगदा आहे.
ही बोगदा सुमारे 350 मीटर लांबीचा असून 12.6 मीटर रुंद आणि 10.25 मीटर उंच आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या मार्गात डोंगराळ भागात सात बोगदे असतील.
तर एक बोगदा समुद्राखाली असेल. समुद्राखालील हा भारताचा पहिला बोगदा असेल.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाची अंदाजे किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे.