Photo : गोडी वाढली! साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ
सध्या देशात ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. हंगाम सुरु असतानाचं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे समजते.
देशातील विविध राज्यात साखरेचं बंपर उत्पादन झालं आहे. त्यामुळं सध्या साखरेचा विक्रमी साठा झाला आहे.
चालू ऊस गाळप हंगामाच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरची आकडेवारी समोर आली आहे. या तिमाहीमध्ये साखरेचं विक्रमी उत्पादन झालं आहे. देशातील साखरेचे उत्पादन 3.69 टक्क्यांनी वाढून 120.7 लाख टन झाले आहे.
भारत हा साखर उत्पादन करणारा जगातील आघाडीवरचा देश आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 116.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात यंदा वाढ झाली आहे.
साखर कारखानदारांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी 500 साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केले होते. तर यंदा ते 509 साखर कारखान्यांकडून ऊसाचं गाळप सुरु आहे.
महाराष्ट्रातील साखर उत्पादन 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत 45.8 लाख टनांवरून 46.8 लाख टनांपर्यंत वाढले आहे. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 30.09 लाख टनांवर पोहोचले आहे
कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 26.01 लाख टनांच्या तुलनेत 26.27 लाख टनांवर गेले आहे. गुजरातमध्ये 3.8 लाख टन, तामिळनाडूमध्ये 2.6 लाख टन आणि इतर राज्यांमध्ये 9.9 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. पुढचे दोन ते तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम सुरु राहणार आहे. त्यामुळं उत्पादनात वाढ होणं अपेक्षीत आहे.