PM Modi : कधी हातात कॅमेरा, तर कधी बंदूक; 2022 वर्षात 'या' अंदाजात दिसले पंतप्रधान मोदी, पाहा व्हायरल फोटो

PM Narendra Modi Photos : 2023 नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. भारतासाठी 2022 हे वर्ष फार महत्त्वाचं ठरलं आहे.

PM Narendra Modi Photos

1/16
2022 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो चांगलेच चर्चेत आहेत. हे फोटो कोणते आहेत पाहा.
2/16
पंतप्रधान त्यांच्या दौऱ्यावेळी विमानात काम करताना दिसत आहेत.
3/16
केदारनाथ धामची प्रदक्षिणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
4/16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारगिल दौऱ्याचे फोटो व्हायरल झाले होते.
5/16
हा फोटो मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील आहे. आफ्रिकेतून भारतात आलेले आठ चित्ते पंतप्रधानांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते.
6/16
कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान मोदी यांना फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही.
7/16
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करताना. हा फोटो दिल्लीतील एका बोगद्याच्या उद्घाटनादरम्यानचा आहे.
8/16
भारतीय रेल्वेला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
9/16
हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांच्या वाढदिवसाचा आहे. मोदी आईच्या वाढदिवशी त्यांना भेटायला गेले होते. काही दिवसांपूर्वी हिराबा यांचे 100 व्या वर्षी निधन झाले आहे.
10/16
हा फोटो नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाच्या वेळेचा आहे. यावेळी मोदी एका नवजात बाळाला आपल्या मांडीवर घेऊन मेट्रोने प्रवास करत आहेत.
11/16
पंतप्रधान मोदी यांनी नागपूर दौऱ्यावेळी ढोलवादनाचा आनंद लुटला.
12/16
इंडोनेशियातील बाली येथे भारताने G20 परिषदेचे अध्यक्षपद स्विकारले, त्यावेळीचा हा फोटो आहे.
13/16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारगिल दौऱ्याचे फोटो व्हायरल झाले होते.
14/16
मोदींच्या वाराणसी दौऱ्याचा हा फोटो आहे. एका छोट्या हॉटेलमध्ये बसून पंतप्रधान चहा पिताना दिसत आहे.
15/16
हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोन उडवले त्यावेळचे आहे.
16/16
हा फोटो माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अंगरक्षकाच्या घोड्याचे आहे. या घोड्याचे नाव विराट असून पीएम मोदी त्याला निरोप देत आहेत.
Sponsored Links by Taboola