Bhagwant Mann Marriage Photos : भगवंत मान आणि गुरप्रीत कौर लग्नाच्या बेडीत; पाहा Exclusive फोटो
Bhagwant Mann Gurpreet Kaur Marriage First Photos : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्यासोबत आपली लग्नगाठ बांधली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शासकीय निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार राघव चड्ढा यांच्यासह अनेक मोठी नेतेमंडळी उपस्थित होती. दोघांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डॉक्टर गुरप्रीत कौर चंदीगढ यांच्या शासकीय निवासस्थानी विवाहसोहळा पार पडला.
48 वर्षांच्या भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे. त्यांनी डॉक्टर गुरप्रीत कौर यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
भगवंत मान यांच्या लग्नाचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये भगवंत आणि गुरप्रीत कौर लग्नाच्या विधी पार पाडताना दिसत आहेत.
भगवंत मान आणि गुरप्रीत कौर एकमेकांना गेल्या चार वर्षांपासून ओळखतात.
फोटोंमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत खासदार राघव चड्ढाही दिसत आहेत.