Beating Retreat Ceremony: अटारी-वाघा बॉर्डरवर पार पडला ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा; पाहा फोटो!
15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या गौरवशाली इतिहासात नोंदवला गेला आहे. कारण याच तारखेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले.(फोटो सौजन्य : ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. या दिवशी देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न झाला आहे.(फोटो सौजन्य : ANI)
या दरम्यान लोक देशभक्तीपर गाणी गातात, नाचतात आणि भारतीय ध्वज फडकावतात, त्यानंतर उत्सवाचे वातावरण असते.(फोटो सौजन्य : ANI)
हाच उत्साह आणि जल्लोष काल अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर बघायला मिळाला.(फोटो सौजन्य : ANI)
परंपरेनुसार स्वातंत्र दिनाच्या एक दिवस आधी अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.(फोटो सौजन्य : ANI)
भारतीय परंपरा आहे की स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट कार्यक्रम आयोजित केला जातो. या दिवशी लोक येथे जमतात आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतात.(फोटो सौजन्य : ANI)
तसेच यावेळी भारत पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये मिठाईचीही देवाण-घेवाण करण्यात आली.(फोटो सौजन्य : ANI)