Eid-ul-Adha 2023 : देशभरात बकरी ईदचा उत्साह, मशिदींमध्ये सामुहिक नमाज पठण; पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
ईद-उल-अधानिमित्त ऐतिहासिक जामा मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी मुस्लिम बांधव सामुहिक नमाज पठण करताना दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबकरी ईदच्या निमित्ताने जामा मशीद आणि इतर भागांसह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत जनतेला बकरीदच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी सामाजिक सलोख्यासह देशात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे.
रमझान ईदनंतर ईद-उल-अधा हा मुस्लिम बांधवाचा दुसरा पवित्र सण आहे. याला बकरा-ईद किंवा बकरीद असंही म्हटलं जातं. इस्लामिक हिजरी कॅलेंडरच्या 12 व्या महिन्याच्या 10 व्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
गुरुवारी सकाळपासूनच मशिदी आणि इदगाहांमध्ये नमाज्यांनी गर्दी केली होती.
लोकांनी नमाज अदा करून देशात सुख-समृद्धीसोबतच शांतता आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली. कुर्बानी हा बकरी ईदचा सर्वात महत्वाचा भाग आहे. या दिवशी बकऱ्यांचा बळी दिला जातो.
बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व आहे.
या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. या कुर्बानीनंतर जे मांस मिळतं त्याचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वतःसाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी दान करण्यात येतो. कुर्बानी तीन भागांत व्यवस्थित वाटल्यानंतरच वैध मानली जाते.
यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक सलोखा कायम रहावा म्हणून जगप्रसिद्ध बालाजी मंदिर असलेल्या देऊळगाव राजा आणि विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील मुस्लिम बांधवांनी या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.