आसाममध्ये आभाळ फाटलं! 30 जिल्ह्यात पाणीच पाणी, 70 जणांचा मृत्यू, लाखो रस्त्यावर, धडकी भरवणारे Photos
अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआसाममधील फोटो पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही....
आसाममधील 30 जिल्ह्यांतील तब्बल 37 लाख नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे.
दरड कोसळून व पुरामुळे तब्बल 70 जण मृत्युमुखी पडले आहेत.
तर अनेकजण बेपत्ता आहेत.
घरं पाण्याखाली गेल्यामुळे संसार उघड्यावर आलाय.
डोक्यावरील छत तर गेलेच... खाण्याचेही वांदे झाले..
नागरिकांची तारांबळ उडाली असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेकजण रस्त्यावर आले आहेत.
आसाम राज्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.
जनजिवन विस्कळीत झालेय.
बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
फक्त नागरिकचं नाही, तर जनावरे आणि पक्षांचेही हाल होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील पूरस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे विविध ठिकाणच्या मदत शिबिरांत आश्रयास आलेल्या पूरग्रस्तांची भेट घेत आहेत.
मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.
राज्यभर 350 पेक्षा जास्त मदत शिबिरात जवळपास दीड लाखांहून अधिक पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे.
संततधार पावसामुळे रस्ते खचले आहेत....
अनेकांचा संसार उघड्यावर आलाय.
रस्ते वाहून गेले आहेत.
पाण्यातून वाट काढून जाताना नागरिक
मदत शिबारात अनेकांनी आश्रय घेतलाय.
वाहने पाण्याखाली गेली आहेत.
लहान मुलांचेही प्रचंड हाल होत आहेत.
पूरात अडकलेले नागरिक एकमेंची मदत करत आहेत.
हा फोटो पाहून तुम्हाला तेथील परिस्थितीचा अंदाज येईल.
जनावारांनाही वाचवण्यात येत आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ पथक कसोशीने प्रयत्न करतेय
अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
आसाममध्ये जनजिवन विस्कळीत झालेय.