INS Trikand Photo : ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी नौदलाचा पुढाकार
कोरोनाच्या संकटकाळात शक्य त्या सर्व परिनं प्रत्येकजण मदतीचा हात देत आहे. देशाच्या संरक्षणार्थ तत्पर असणारी दलंही यात मागं नाहीत. लष्कर, नौदल आणि वायूदल यात पुढाकार घेताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोहा येथून ऑक्सिजन आणि मदत सामग्री घेऊन नौदलाचं जहाज आयएनएस त्रिखंड नुकतंच मुंबई बंदरात दाखल झालं आहे. (छाया सौजन्य एएनआय)
सोमवारी सकाळी ही युद्धनौका थेट कतारहून भारतात दाखल झाली. यामध्ये 20 मॅट्रिक टन इतक्या क्षमतेचे दोन ऑक्सिजन सिलेंडर भारतात आणण्यात आले आहेत.
5 मे या दिवशी ही युद्धनौका भारतातून दोहा येथे पोहोचली होती. ज्यानंतर ही नौका 10 तारखेला मुंबई बंदरात दाखल झाली.
मुंबईत आलेले हे ऑक्सिजन कंटेनर एका यंत्राच्या सहाय्यानं वाहतूकीसाठीच्या वाहनावर लोड करण्यात आलं. ज्यानंतर आता आवश्यक त्या ठिकाणी हा ऑक्सिजन साठा पोहोचणार आहे.
युद्ध, शोधमोहिम आणि युद्ध सरावासाठी भारतीय नौदलाच्या त्रिखंड या जहाजाचा वापर केला जात होता. पण आता मात्र या विषाणूशी लढा देण्यासाठीही ही नौका सेवेत हजर झाली आहे.
ऑपरेशन समुद्र सेतू 2 या ऑपरेशन अंतर्गत भारतीय नौदलाकडून आयएनएस त्रिखंड, आयएनएस कोची यांसारख्या युद्धनौकांच्या सहाय्यानं आवश्यक ती वैद्यकीय सामग्री परदेशातून भारतात आणण्याचं महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आलं आहे.
कोरोनाविरोधात देशाची लढाई अतिशय मोठी आहे. त्यामुळं सध्या संरक्षण दलांनी दिलेली मदत अधिक मोलाची ठरत आहे. (छाया सौजन्य एएनआय).
ही युद्धनौका मुंबईत दाखल झाल्यानंतर कॅप्टन हरिश बहुगुणा यांनी नौदलाच्या या मदत कार्यासंबंधीची माहिती माध्यमांना दिली.