National Task Force : कोरोना युद्धात लढा देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर 12 डॉक्टरांची तुकडी सज्ज
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. याची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टानं नॅशनल टास्क फोर्सच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. राज्यांना असणारी ऑक्सिजनची गरज-पुरवठा यातल्या समन्वयासाठी हा टास्क फोर्स काम करणार आहे. एकूण 12 सदस्यांत वेगवेगळ्या मेडिकल संस्थांवरचे तज्ज्ञ, आरोग्य मंत्रालयातल्या सचिवांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉ. सौमित्र रावत - दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात ते पोटविकार शस्त्रक्रिया आणि लिव्हर ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी १९२साली त्याचे पदवी शिक्षण मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली येथे केले असून, १९९५ साली ते युके मध्ये पोटविकार शस्त्रक्रिया या विषयातील अधिक अभ्यासाकरिता गेले होते. त्यांना २०१५ साली पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. राहुल पंडित, ICU संचालक, फोर्टिस रुग्णालय, मुलुंड, मुंबई
डॉ. देवेन्द्रसिंग राणा
डॉ. जे. व्ही. पीटर - वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे संचालक आणि क्रिटिकल मेडिसिन विभागाचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी ११९४, तामिळनाडू येथील एम जी आर वैद्यकीय विद्यापीठातून तुपाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
डॉ. शिवकुमार सरीन- दिल्ली येथील इन्स्टिटयूट ऑफ लिव्हर अँड बिलरी सायन्स येथे संचालक म्हणून कार्यरत असून त्यांनी १९८१ साली पोटविकार (गॅस्ट्रोइंट्रोलॉजी ) या विषयात शिक्षण दिल्ली येथील एम्स या संस्थेतून घेतले आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. देवी प्रसाद शेट्टी- बंगळुरू येथील नारायणा हेल्थ आणि कार्डियाक इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष असून ते स्वतः कार्डियाक सर्जन आहेत. त्यांनी आतापर्यंत १ लाख २० हजार ह्रदयशास्त्रक्रिया केल्या असून त्यापैकी ४० टक्के शस्त्रक्रिया या मुलांवर केल्या आहेत. २०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. भाबातोष बिस्वास- कोलकात्ता येथील कार्डियाक थोरॅसिक सर्जन असून, त्यांना वैद्यकीय विश्वात मनाचा असणारा डॉ बी सी रॉय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, त्यांना वैद्यकीय क्षेत्रांतील अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. फुफ्फुसाची आणि हृदयाची शस्त्रक्रिया यामध्ये त्याचे विशेष असे काम आहे. पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठावर त्यांनी कुलगुरु म्हणून काम पाहिलेले आहे. सध्या ते केंद्राच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसुटिकल्स अँड रिसर्च या संस्थेवर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
डॉ. ज़रीर एफ उडावाडिया, श्वास रोग विशेषज्ञ, हिंदुजा आणि ब्रीच कँडी रुग्णालय, मुंबई
डॉ. नरेश त्रेहान- कार्डियाक थोरॅसिक सर्जन असून त्यांनी एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिटयूट अँड रिसर्च सेंटरची सतःपण केली असून त्यांनी त्याचे वैद्यकीय पदवी शाखेतील शिक्षण किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज लखनौव येथून केले आहे. ११९१ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती याचे वैयक्तिक सर्जन म्हणून काम केले आहे . त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि बी सी रॉय या आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. गगनदीप कांग - वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पदवी घेतली आहे. सध्या त्या वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज येथे गॅस्ट्रोइन्टेस्टायनल या विभागात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. विषाणूचा अभ्यास या विषयात त्यांचे प्राविण्य असून रोटाव्हायरस च्या महामारीत त्यांनी विशेष असे योगदान दिले आहे.