Amarnath Yatra 2023 : खराब हवामानमुळे अमरनाथ यात्रा स्थगित, प्रशासनाचा मोठा निर्णय
काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्याची परवानगी नाही. (PC : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हवामान पूर्ववत होईपर्यंत यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हवामानात सुधारणा झाल्यावर यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल. (PC : PTI)
काश्मीरमधील अनेक भागात पावसामुळे शुक्रवारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. (PC : PTI)
आज कोणत्याही यात्रेकरूंना गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, शुक्रवारी सकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला, त्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. यात्रेकरूंना बालटाल आणि नूनवान बेस कॅम्पवर थांबवण्यात आलं आहे. (PC : PTI)
हवामानात सुधारणा होताच अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे. (PC : PTI)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4.45 च्या सुमारास जम्मूतील बेस कॅम्पवरून 7,000 हून अधिक भाविकांची तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना करण्यात आली होती. (PC : PTI)
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत 247 वाहनांतून भगवती नगर बेस कॅम्पवरून भाविक घाटीच्या दिशेने निघाले होते. तर, 4600 यात्रेकरूंना घेऊन 153 वाहनांचा ताफा पहलगामला जात होता. तसेच 2410 यात्रेकरूंना घेऊन 94 वाहनांचा दुसरा ताफा बालटाल बेस कॅम्पसाठी पहाटे 4.45 वाजता रवाना झाला होता. (PC : PTI)
(PC : PTI)
यावर्षी 1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून जम्मू बेस कॅम्पवरून एकूण 43,833 यात्रेकरू घाटीकडे रवाना झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंची संख्या 84,000 यात्रेकरुंनी आतापर्यंत अमरनाथ धामचं दर्शन घेतलं आहे. (PC : PTI)
अमरनाथा गुहेची वार्षिक यात्रा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांनी सुरू झाली. यंदा अमरनाथ यात्रा 62 दिवसांची असून 31 ऑगस्टला संपणार आहे. (PC : PTI)