PHOTO: जोशीमठपाठोपाठ कर्णप्रयाग आणि रुद्रप्रयागमध्ये घरांना तडे, रेल्वे प्रकल्पाच्या खोदकामाचा परिणाम असल्याचा गावकऱ्यांना संशय
उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग शहरातील हे घर.. कर्णप्रयागमधील बहुगुणानगर परिसरातील घरांना तडे गेलेत. उत्तराखंडमधल्या चामोली जिल्ह्यातीलच जोशीमठ हे शहर खचत असल्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली होती. थोडक्यात घरे खचणं किंवा त्यांना तडे जाणं हे प्रकार एकट्या जोशीमठपुरते मर्यादित नसून संपूर्ण चामोली जिल्ह्यात असे घरांना तडे जाण्याचे प्रकार अनुभवायला येत आहेत. (PTI Photo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णप्रयागमधील बहुगुणानगरमधील कोसळेल्या घराचा हा भाग. या परिसरात 12 जानेवारीपासून घरांना तडे जाण्याचे आणि घरे खचण्याचे प्रकार होत आहेत (PTI Photo).
चामोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग, जोशीमठ अशा वेगवेगळ्या परिसरात जमीन खचण्याचे आणि त्यामुळेच घरांना तडे जाण्याचे प्रकार दिसत आहेत. जोशीमठमुळे हा प्रकार राष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला, तेव्हा एनटीपीसीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामुळे असे प्रकार होत असल्याचे आरोप पर्यावरणवाद्याकडून करण्यात आले. मात्र एनटीपीसीने ही शक्यता आरोप फेटाळून लावलीय. (PTI Photo)
काहीतरी मदत मिळेल, सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन होईल या आशेने गावकरी येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्या पडक्या घरांचे फोटो काढू देतात. सर्वोच्च न्यायालयाने या संकटाला राष्ट्रीय संकट मानायला नकार देऊन त्यांच्या याचिकेची तातडीने सुनावणी केली नाही. त्यामुळे इथल्या रहिवाश्याची भिती वाढलीय (PTI Photo)
घराचा फक्त बाहेरचा भागच नाही तर आतील बाजूसही हे तडे स्पष्ट दिसतात. काही रहिवाश्यांची घरे तर पडलीही आहेत. त्यामुळेच चामोली जिल्ह्यातच भीतीचं सावट पसरलं आहे.. जोशीमठ-रुद्रप्रयागचं लोण आपल्याकडेही येईल असं इथल्या गावकऱ्यांना वाटतं. (PTI Photo)
चामोली जिल्ह्यातील जोशीमठ आणि कर्णप्रयागच नाही तर शेजारच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यातही घरांना तडे जाण्याचे प्रकार आढळून आले आहेत. उत्तराखंडमध्ये पाच प्रयाग असल्याचं सांगितलं जातं. प्रयाग म्हणजे दोन नद्यांचा संगम.. रुद्रप्रयाग त्यापैकीच एक.. अन्य चार प्रयागांमध्ये विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, देवप्रयाग आणि कर्णप्रयाग यांचा समावेश होतो. (PTI Photo)
कर्णप्रयागमधील घरांना तडे पडल्यानंतर अनेक रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. त्यासाठीच अनेकजण राहत्या घरातील आवश्यक सामान घेऊन बाहेर पडत आहेत. (PTI Photo)
कर्णप्रयागमधील फक्त जमिनीवरील नाही तर दुमजली किंवा त्यावरील घरांनाही तडे गेलेत. वर्षानुवर्षे या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना आता भीतीच्या सावटात राहावं लागतंय. घरांना तडे गेल्यामुळे किंवा घरे खचल्यामुळे टीव्हीचे डिश अँटेना बिनकामाचे झाले आहेत. (PTI Photo)
कर्णप्रयागमधील या घराची अवस्था फार बिकट झालीय. घाटमाथ्यावर असलेल्या या घराची बैठकीच्या खोलीची भिंतच कोसळून पडलीय. त्यामुळे संपूर्ण घरच राहण्यासाठी असुरक्षित बनलंय. या घरातील लोकांना विस्थापित होण्याशिवाय पर्याय नाही. (PTI Photo)
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मारोडा गावातील हे घर पूर्णपणे कोसळलंय. हे घर माती-दगडाचं आहे. ऋषिकेश आणि रुद्रप्रयाग यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचा बोगदा या पडझडीसाठी कारणीभूत असल्याचा संशय या गावातील लोकांना आहे. (PTI Photo)
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मारोडा गावातील हे आणखी एक घर.. एखाद्या भूकंपात किंवा अतिक्रमणाच्या तोडक कारवाईत जमीनदोस्त व्हावं तसं हे घर झालंय. पर्यावरणाचा समतोल न ठेवणारी विकासकामे कशी जिवघेणी असतात, हे गावातील लोकांपेक्षा दुसरं कोण चांगलं सांगू शकेल? (PTI Photo)
हा फोटो आहे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील. रुद्रप्रयाग ते ऋषिकेश या दोन तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रेल्वेमार्गासाठी बोगदा खणण्याचं काम सध्या थांबलेलं आहे. या मारोडा गावातील ही प्रकल्पाची साईट. (PTI Photo)
रुद्रप्रयागमधील रेल्वे प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामामुळेच घरांना तडे जात असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे. जोशीमठ परिसरातही एनटीपीसी प्रकल्पामुळे घरांना तडे जात असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केला होता. या दोन्ही जिल्ह्यातील घरांना तडे जाण्याच्या प्रकारानंतरही या प्रकल्पाची कामे सुरु आहेत. (PTI Photo)