PHOTO : शत्रूला धडकी भरवणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांचा 'एलिफंट वॉक' पाहिलाय का?
भारतीय वायू दर म्हणजे इंडियन एयरफोर्सने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आपल्या लढाऊ विमानाचा 'एलिफंट वॉक' आयोजित केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये 75 लढाऊ विमानांनी भाग घेतला.
या प्रदर्शनाच्या कार्यक्रमात राफेल विमानांच्या सोबत जग्वारच्या फ्लीटनेही भाग घेतला होता. 'Gusts of Rafales, Prowl of Jaguars' असं ट्वीट इंडियन एयरफोर्सच्यावतीनं करण्यात आलं आहे.
हे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येईल तर शत्रूला नक्कीच धडकी भरली असेल.
जेव्हा अनेक प्रकारचे लढाऊ विमानं एकाच ठिकाणाहून, एकाच वेळी उड्डाण घेतात तेव्हा टेक ऑफच्या सुरुवातीला 'एलिफंट वॉक' असं म्हटलं जातं. अमेरिकेमध्ये या संकल्पनेचा वापर केला जातो.