Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Vande Bharat Train: लवकरच देशाला मिळणार 17 वी 'वंदे भारत' एक्सप्रेस, 15 मे रोजी होणार उद्घाटन
भारतीय रेल्वेने सध्याच्या काळात अनेक राज्यांतील विविध रेल्वे मार्गांवर 'वंदे भारत' एक्सप्रेस सुरु केली आहे. आता लवकरच देशाला 17 वी 'वंदे भारत' एक्सप्रेस मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही 'वंदे भारत' एक्सप्रेस हावडा ते पुरी अशी धावणार आहे. वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
तसेच बंगामधून धावणारी ही दुसरी 'वंदे भारत' एक्सप्रेस आहे, तर ओडीसामधील ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे.
ही गाडी हावडा जंक्शनपासून, भुवनेश्वर, जाजपुर क्योंझर रोड, कटक, भद्रक, बालेश्वर, हल्दियामधून पुरीपर्यंत जाणार आहे.
चाचणी दरम्यान ही गाडी सकाळी 6.10 वाजता हावडा जंक्शनमधून सहा तासांचा प्रवास करत पुरीमध्ये पोहचेल.
रेल्वे मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस 130 किमी ताशी वेगाने धावेल.
तसेच या एक्सप्रेसचे तिकीट दर 1590 रुपये ते 2815 रुपयांपर्यंत आहे.