मोरबी पूल दुर्घटनेत 136 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी
मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यानं (Morbi Bridge Collapse) आतापर्यंत 136 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
दुर्घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्रीही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
पंतप्रधान मोदींनी मोरबीमध्ये बचाव आणि मदत कार्यात सहभागी असलेल्या लोकांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी बचाव कार्य कसं सुरु आहे, याचा आढावा घेतला.
image 8
मोरबी पूल दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्रीही होते.
मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मोरबी येथील एसपी कार्यालयात पोहोचले आणि घटनास्थळाला भेट दिली.