PHOTO : इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?
श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद हे श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म 1896 साली कोलकाता येथे झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1933 साली श्रील प्रभुपाद यांनी त्यांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली.
श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1944 साली 'बॅक टू गॉड हेड' नावाने एक इंग्रजी पत्रिका सुरु केली.
पाश्चिमात्य देशांत श्रीकृष्णाच्या भक्तीचा प्रसार करणे हा त्यामागचा उद्देश होता.
श्रील प्रभुपाद यांची भक्ती आणि कार्याची दखल घेत गौडीय वैष्णव समाजाने 1947 साली त्यांना भक्ती वेदांत अशी उपाधी दिली.
श्रील प्रभुपाद यांनी 1966 साली International Society For Krishna Consciousness (ISKCON) ची स्थापना केली.
इस्कॉन ही एक मोठी भक्ती चळवळ असून 'हरे कृष्णा चळवळ' या नावाने ती ओळखली जाते. या माध्यमातून जगभरात वेदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो.
इस्कॉनच्या माध्यमातून भगवतगीतेचा 89 भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.
इस्कॉनचे संस्थापक श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 125 रुपयाच्या विशेष नाण्याचं अनावरण करण्यात येत आहे