Mukesh Ambani's new Home : कसा आहे अंबानींचा लंडनमधील आलिशान महल?
अंबानींनी खरेदी केलेल्या या आलिशान महलामध्ये 49 बेडरूम्स आहेत. (Photo:@stokepark/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया महलात एक मिनी हॉस्पिटल असून ते सुसज्ज सोईंनी युक्त आहे. (Photo:@stokepark/IG)
ही वास्तू खुल्या वातावरणात आहे. ही वास्तू खूप जुनी असून 1908 सालापर्यंत ती खासगी मालमत्ता होती. (Photo:@stokepark/IG)
त्यानंतर या वास्तूचे एका क्लबमध्ये रुपांतर करण्यात आलं. यामध्ये अलिशान हॉटेल आहे. तसेच या वास्तुच्या आवारात एक गोल्फ क्लबदेखील आहे. (Photo:@stokepark/IG)
अंबानी कुटुंबीय या नवीन घरामध्ये एका मंदिराची निर्मिती करणार असून मुंबईतील दोन पुजाऱ्यांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नवीन महलात गणपती, राधा-कृष्ण आणि हनुमानाची मूर्तीही बसवण्यात येणार आहे. (Photo:@stokepark/IG)
अंबानी कुटुंबियांनी या वर्षीची दिवाळी स्टोक पार्कमधील या नव्या महलात साजरी केल्याची माहिती आहे. आता अंबानी कुटुंबीय परत भारतात येणार असून पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ते या नवीन घरी कायम स्वरुपी वास्तव्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. (Photo:@stokepark/IG)