Athiya Shetty Birthday : सुनील शेट्टीची लाडकी लेक आथियाचा आज वाढदिवस, केएल राहुलकडून प्रेमाची कबुली देत भन्नाट शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Photo:@athiyashetty/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआथिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. (Photo:@athiyashetty/IG)
ती तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे. आथिया शेट्टीबरोबरच्या अफेअरची केएल राहुलनं कबुली दिली आहे. आथियासोबतचा फोटो त्यानं पोस्ट केला आहे. यात हॅप्पी बर्थडे माय लव्ह असं म्हटलं आहे.(Photo:@athiyashetty/IG)
आथिया शेट्टीने 2015 मध्ये निखिल अडवाणीच्या रोमँटिक अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून आथिया डेब्यू केला होता. (Photo:@athiyashetty/IG)
या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. या चित्रपटात आथियासोबत सूरज पांचोली मुख्य भूमिकेत दिसला होता.. (Photo:@athiyashetty/IG)
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आथियाने अभिनय विश्वात केलेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. या यादीत ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ देखील फ्लॉप ठरले आहेत.(Photo:@athiyashetty/IG)