Benefits Of Parrot : घरात पोपट पाळणे योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर...
घरात पोपट पाळणे खूप शुभ मानले जाते. पोपट एका ग्रहाशी संबंधित आहे. घरात पोपट पाळल्यास तुमच्यावर हा ग्रह प्रसन्न होऊ शकतो. पोपट पाळण्याचे फायदे जाणून घेऊया.(Photo Cradit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरात पोपट पाळणे खूप शुभ मानले जाते. पोपट पाळल्याने घराला आर्थिक लाभ मिळण्यास तसेच व्यवसायात वाढ होण्यास मदत होते. पोपट हे कामदेवाचे वाहन मानले जाते. त्याचबरोबर पोपटाचा संबंध संपत्तीची देवता कुबेरजी यांच्याशीही आहे.(Photo Cradit : Pixabay)
पोपटाचा रंग हिरवा असतो. त्यामुळे पोपट हा बुध ग्रहाचा कारक मानला जातो. बुध ग्रह हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जातो.(Photo Cradit : Pixabay)
जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह प्रभावी असेल तर तुम्ही बुद्धिमान असाल. त्याचबरोबर बुध ग्रह व्यापार किंवा व्यवसायाशी संबंधित आहे. जर तुमचा बुध प्रभावी असेल तर तुम्ही चांगले व्यापारी होऊ शकता. (Photo Cradit : Pixabay)
जर तुम्हीही तुमच्या घरात पोपट आणला असेल किंवा पोपट पाळला असेल तर विशेष काळजी घ्या की, पोपट नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा. पोपट पाळण्यासाठी वास्तुशात्रानुसार ही दिशा योग्य मानली जाते. (Photo Cradit : Pixabay)
वास्तुशात्रानुसार या दिशेला पोपट ठेवण्याचा अर्थ लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्याकडून होतो. त्यामुळे या दिशेला पोपट पाळल्याने घरात लक्ष्मी आणि कुबेर देव यांची कृपादृष्टी कायम राहते. (Photo Cradit : Pixabay)
तसेच जर तुम्ही तुमच्या घरात पोपट ठेवण्याचा विचार करत असाल तर वास्तुशात्रानुसार पोपट एकटा पळू नये. घरात नेहमी पोपट आणि मैना यांची जोडी पाळावी.(Photo Cradit : Pixabay)
त्याचे कारण म्हणजे तुमच्या घरात पती-पत्नीमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नात्यातील गोडवा वाढतो.(Photo Cradit : Pixabay)
असे मानले जाते की पोपट हा एक निष्ठावान पक्षी आहे. तो पाळल्याने घरातील लोकांचे अकाली मृत्यूपासून संरक्षण होते. असे ही म्हटले जाते की, पोपट तुमच्यावर येणाऱ्या समस्यांना दूर ठेवतो. ज्या घरात पोपट असतो त्या घरातील लोक भाग्यवान असतात आणि त्यांच्यावर देवाची कृपा राहते.(Photo Cradit : Pixabay)
जर तुमच्या घरी मुलं शिकत असतील आणि त्यांना अभ्यासात रस नसेल तर तुम्ही पोपट पाळू शकता. पोपट पाळल्याने मुलांचे मन वेगाने काम करू लागते आणि त्यांची एकाग्रता वाढते. पोपट पाळल्याने मुलांची अभ्यासात रुची वाढते.(Photo Cradit : Pixabay)