Ashadhi Wari 2023 : रुक्मिणी आणि गजानन महाराजांची पालखी आज हिंगोलीत, पाहा फोटो
रुक्मिणी मातेची पालखी आज वाशिमवरुन प्रस्थान होऊन हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करत असून आज पालखी कण्हेरगाव नाका या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर शेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी आज हिंगोलीमध्ये पोहोचली आहे.
विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे (Rukmini Mata) माहेर अशी श्रीक्षेत्र कोंडण्यपूरची ओळख आहे. या ठिकाणाहून श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 मे रोजी प्रस्थान झाली आहे.
आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 428 वर्षांपासून सुरु आहे. संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता. वारीचे हे 429 वे वर्ष आहे.
आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते. 25 जून रोजी ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
गण गण गणात बोते आणि विठ्ठल नामाच्या गजर करत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं हे 54 वं वर्ष आहे.
साडेसातशे वारकरी 550 किलोमीटरचा पायी प्रवास एका महिन्यात पूर्ण करून आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात.
पांढरीशुभ्र कपडे, हातात भगवा झेंडा आणि शिस्तीत चालणारे वारकरी हे या वारीचे वेगळेपण असतं.
आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून 43 पालख्या पंढरपुरात दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.