Exit Poll 2024
(Source: Matrize)
UAE Hindu Temple : अबुधाबी येथे पहिले हिंदू मंदिर, 14 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन!
पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराच उद्घाटन येत्या 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अबुधाबी येथील या मंदिरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधल आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
अबुधाबी येथून 40 किलोमीटर, तर दुबई येथून 105 किलोमीटरवर हे मंदिर आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
भारतीय राजदूत संजय सुधीर यांच्या निमंत्रणावरून 42 देशांचे प्रतिनिधी अबुधाबी येथील हिंदू मंदिराला भेट देणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 60 हून अधिक विदेशी पाहुण्यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये अमेरिका, अर्जेंटिना, आर्मेनिया, बहरीन, बांगलादेश, जर्मनी, घाना, आयर्लंड, इस्रायल, इटली, कॅनडा, चाड, चिली, सायप्रस, चेक रिपब्लिक, डोमिनिकन रिपब्लिक, इजिप्त, युरोपियन युनियन, फिजी या देशांचे राजदूत होते. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी युएइला गेले असता, तेथील राजाने नरेंद्र मोदी यांना 27 एकर जागा मंदिरासाठी भेट म्हणून दिली होती.स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार अबुधाबी येथील वाळवंटात हे मंदिर बांधण्यात आलं आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
पश्चिम आशियातील मुस्लिम देशात सर्वात मोठे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वामीनारायण संस्थेने घेतली. सातशे कोटी रुपये खर्च करून 27 एकर जागेवर हे मंदिर बांधण्यात आलं. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
या मंदिराला सात कळस असून संयुक्त राष्ट्र अमिरातील सात राज्याचं हे प्रतिनिधित्व करतात. या सात मंदिराच्या समूहात आपल्या देशातील विविध देवी देवतांचे मूर्ती बसवण्यात आले आहेत. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
मंदिराचे बांधकाम हे भारतीय शिल्पकलेनुसार आहे त्यामुळे कुठल्या मुस्लिम देशात इतकं मोठं हे पहिलं मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हे अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बांधकामाच्या धर्तीवर करण्यात आले असून, त्यामुळे या मंदिराला पुढील एक हजार वर्षापर्यंत कुठलेही नुकसान होणार नाही. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)
पश्चिम आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून, कुठल्याही मुस्लिम देशात हे भारतीय शैलीतील हे पहिलं मोठ मंदिर आहे. आता येत्या 14 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होणार आहे व सामान्य भाविकांसाठी हे मंदिर खुलं होणार आहे. (Image Source : Facebook/Saina Nehwal/Mitesh Patel)