Sharad Yadav Death: समाजवादी नेता हरपला, शरद यादव यांचं निधन
Sharad Yadav: माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या मुलीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. पापा नहीं रहे, असं ट्वीट शरद यादव यांच्या मुलीनं केलं आहे. गुरुग्राम येथील फोर्टिंस रुग्णालयात शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.
शरद यादव यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला, त्यानंतर त्यांनी सुरुवातीचे शिक्षण तिथेच केले.
यादव यांना तरुणपणातच राजकारणाची आवड निर्माण झाली, त्यांनी जबलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले. यावेळी ते विद्यार्थी राजकारणातही सक्रिय झाले होते आणि अभ्यासातही अव्वल आले होते.
शरद यादव यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर 1974 मध्ये ते पहिल्यांदा जबलपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. यादरम्यान ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशीही जोडले गेले.
यानंतर शरद यादव यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. 1977 मध्ये ते जबलपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. यादरम्यान ते युवा जनता दलाचे अध्यक्षही झाले.
यानंतर 1986 मध्ये शरद यादव पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. पुढे 1989 मध्ये यूपीच्या बदायूं लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर त्याच वर्षी त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळाले.
13 ऑक्टोबर 1999 मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा कारभार होता. 2001 मध्ये केंद्रीय श्रम मंत्री म्हणून काम पाहिले.
शरद यादव हे 1991 ते 2014 पर्यंत शरद यादव बिहारमधील मधेपुरा मतदारसंघातून खासदार म्हणून सातत्यानं निवडून आले. यादव यांची 1997 मध्ये जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही निवड झाली होती.
शरद यादव यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांचा समावेश आहे.
शरद यादव हे मुळचे मध्य प्रदेश मधील होते. 1974 मध्ये त्यांनी संसदीय राजकारणाला सुरुवात केली होती. शेतकरी, कामगारांच्या मुद्यांवर शरद यादव यांनी भरीव काम केलं आहे. शरद यादव यांच्या निधनावर देशभरातील सर्वच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. बडे बडे नेते शरद यादवांच्या राजकीय प्रवासाचं वर्णन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत.