Tomato Price: टोमॅटोची लाली उतरली, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, बांधावर लाल चिखल
रस्त्यावर लाल टोमॅटोचा ढीग दिसला की प्रत्येकाला आपण शिकत असताना दहावीच्या वर्गात असलेल्या लाल चिखल या पाठाची नक्कीच आठवण होते.. आज हा लाल चिखल आठवण्याचं कारण आहे सध्या पडलेले टोमॅटोचे भाव आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा झालेला लाल चिखल.. एकीकडे महागाई वाढत असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मात्र भाव मिळत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेताच्या बांधावर पडलेला टोमॅटोचा खच.. एरवी यापैकी एक ना एक टोमॅटोची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्याने आता मात्र हे टोमॅटो चक्क बांधावर टाकून द्यायला सुरुवात केली आहे.
बीडमधील चौसाळा मधल्या नंदू जोगदंड यांनी या दोन एकर टोमॅटो साठी अडीच लाख रुपयांचा खर्च केला आणि ज्यावेळी या टोमॅटोची पहिली तोडी केली आणि हा टोमॅटो बाजारात पाठवला
बाजारातील ही पट्टी बघीतली आणि नांदूच्या पाया खालची माती सरकली..पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकरी भाजीपाला लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत मात्र या शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी चांगला भाव हाती लागल याची शाश्वती नाही उलट एकाच वेळी हे शेतकरी एखाद्या भाजीपाल्याची लागवड करतात आणि एकाच वेळी हा बाजारात आलेला भाजीपाला कवडीमोल दराने विकला जातो.
या शेतामध्ये टोमॅटोची लागवड ज्यावेळेस चालू होते त्यावेळी बाजारामध्ये 15 ते 20 रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात होते. त्यामुळे जर तो भाव या शेतकऱ्याला मिळाला असता तर या दोन एकर शेतीतून त्याला पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं असतं..
पण उत्पन्न जाऊ द्या हे टोमॅटो शेतातून काढून बाहेर टाकायला सुद्धा या शेतकऱ्याला सध्या परवडत नाही. खरिपाचे पीक घेतल्यानंतर शेतकरी या टोमॅटोची लागवड करतात आणि हिवाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बाजारात टोमॅटो विक्रीसाठी येतात.
इतर शेती पिकाप्रमाणे भाजीपाल्यांना हमीभाव नसतो त्यामुळे कधी पंधरा-वीस रुपयाला विकला जाणारा हा टोमॅटो आता चक्क एक रुपया आणि दोन रुपयांनी विकला जात आहे.
चौसाळा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात मात्र सध्या पडलेल्या टोमॅटोच्या भावामुळे शेतातील बांधावर असा टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला या टोमॅटोकडे बघितले की हळहळ वाटते.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हाताने हे टोमॅटो असे बांधावर टाकले आहेत, त्यांच्या मात्र हा स्वप्नाचा चिखल झालेला असतो.
रस्त्यावर लाल टोमॅटोचा ढीग दिसला की प्रत्येकाला आपण शिकत असताना दहावीच्या वर्गात असलेल्या लाल चिखल या पाठाची नक्कीच आठवण होते..