Diwali 2021 : फराळ, फटाके आणि दिवाळीचा किल्ला...! बच्चे कंपनींची धमाल...
दिवाळीचा सण म्हणजे सर्व बाळगोपाळांना आणि मोठ्यांनाही आनंदाचा सोहळा. (दिवाळी किल्ला :सुघोष निगले)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा या आनंदाच्या सोहळ्यात “दिवाळी किल्ला” बनवणे ही तर मोठी पर्वणीच. (दिवाळी किल्ला : अर्चित पाटील)
आणि जर का हा किल्ला शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला असेल तर हा योग काय वर्णावा.........! (दिवाळी किल्ला :संजीवनी आहेरराव, बेंगलुरु)
अश्यातच किल्ला करायला मुलांना उत्साह मिळावा म्हणून काही संस्था देखील दिवाळीत वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करतात (दिवाळी किल्ला :दत्तात्रय बेलमकर)
मराठमोळी मंडळी तर आवर्जून दिवाळीत किल्ले करण्यात मागे हटत नाही, अश्यातच अमराठी राज्यात देखील किल्ले बांधणी स्पर्धा घेतल्या जातात (दिवाळी किल्ला :मनाली जोशी)
गेल्या वर्षी मिळालेल्या अभुतपुर्व प्रतिसादामुळे यंदाही महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूतर्फे दिवाळीनिमित्त किल्ले बनवण्याची स्पर्धा, महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरुचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे (दिवाळी किल्ला :संतोष सूर्यवंशी, कोल्हापूर)
मुलं “ऐतिहासिक किल्ले” बनवताना आपोआप त्याची थोडी माहिती घेतील, किल्ले भ्रमण करण्याची, शिवचरित्र वाचण्याची जिज्ञासा निर्माण होईल, किल्यांच्या रूपाने ऐतिहासिक स्थाने जतन करण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे असं, संस्थेच्या अध्यक्षा, माणिकताई पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं (दिवाळी किल्ला :यश भूमकर, पुणे)
अश्याच काही चिमुकल्यानी साकार केलेले किल्ले सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत (दिवाळी किल्ला :श्रद्धा ब्रह्मे)
लहान मुलांना सहकार्य करण्यासाठी तरुण मुले आणि पालकवर्ग सहकार्य करतात (दिवाळी किल्ला :राहुल प्रदीप तिळवे)
(दिवाळी किल्ला :: आदित्य बाबासाहेब जगदाळे, मु . पो. मलकापूर ता - कराड)