Jyotiraditya Shinde In Kolhapur : ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; युवकांशी साधला संवाद, प्रति पंढरपूर नंदवाळमध्ये घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे लोकसभा प्रवास योजनेतंर्गत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विकासकामाचे उद्धाटन तसेच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरवीर तालुक्यातील म्हाळुंगेत ज्योदिरादित्य शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी त्यांनी योजनेच्या उपस्थित सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला.
करवीर तालुक्यातील कांडगावात ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येणार्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रति पंढरपूर नंदवाळ येथे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.
गडहिंग्लजमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 'किसान सन्मान निधी लाभार्थी शेतकरी संवाद मेळावा' पार पडला.
आपल्या देशाची क्षमता पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ओळखली आहे, त्यांचे विचार व कल्पनांना युवकांनी बळ द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांच्या नवीन विचार व संकल्पनावर देश प्रगतीची शिखरे गाठत असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात सहकार, पर्यटन, उद्योग वाढीला चांगला वाव आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर येथील विमानतळासाठी 280 कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे यांनी सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारकाला भेट दिली.
सरसेनापती प्रतापराव गुर्जरांसह सात वीरांच्या इतिहास, स्मृती-संग्रामातून देश कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
केंद्रीय मंत्री शिंदे यांनी युवकांशी संवाद साधल्यावर त्यांनी शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. वीज, आरोग्य व इंटरनेटच्या सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याचे सांगितले.