PHOTO : छान किती दिसते फुलपाखरु...धुळ्यात आढळल्या फुलपाखरांच्या 121 प्रजाती
सभोवताली भिरभिरणारी फुलपाखरे पाहून आपले प्रत्येकाचे मन आनंदी होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविविध फुलांवरील मकरंद गोळा करणाऱ्या फुलपाखरांच्या धुळे जिल्ह्यात 75 तर शहरात 36 प्रजाती आढळून आले आहेत
निसर्ग वेध समितीने केलेल्या या सर्वेक्षणात ही माहिती समोर आल्याने निसर्गप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे
फुलपाखरांच्या विविध प्रजाती आपण नेहमीच पाहतो रंगीबिरंगी आणि विविध आकारांची फुलपाखरे ही नेहमीच कुतूहलाचा विषय असतात.
याच फुलपाखरांचे धुळ्यातील निसर्ग वेध समितीने जिल्ह्यात प्रथमच सर्वेक्षण केले.
जिल्ह्यात फुलपाखरांच्या 75 तर शहरात जवळपास 46 प्रजाती आढळून आल्या आहेत.
निसर्गाच्या अन्नसाखळीत फुलपाखरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
अंडी, त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या, अळ्यांनी विणलेले कोष आणि त्यातून बाहेर येणारे फुलपाखरु असे त्यांचे जीवनचक्र असते.
या फुलपाखरांच्या देशात 1 हजार 504 तर महाराष्ट्रात 167 प्रजातींची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
त्यात धुळे जिल्ह्यात 75 प्रजाती आढळून आल्याने निसर्गप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे.