धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाणे परीसरात अचानक मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेथील पोलीस स्टेशन शेजारील घरांचे पत्रे उडाले असून संसार उपयोगी वस्तूचेही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.
स्फोट एवढा मोठा होता की पोलीस स्टेशनच्या काचा देखील फुटल्या आहेत, या परिसरात सर्वत्र धुळ पसरली होती.
पोलीस स्टेशनच्या समोर खुल्या जागेतच हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजात मोबाई शॉप, ग्राहकसेवा केंद्राचेही नुकसान झाले
या स्फोटोनंतर बॉम्बशोधक पथक व श्वॉनपथक घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली
या स्फोटामुळे वाशी शहरांमध्ये एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पूर्वी कधी तरी जिलेटिन कांड्या नष्ट करायच्या उद्देशाने पुरुन ठेवल्या असल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज