Farmers Protest : हजारो शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून, पाहा फोटो...
शेतकरी आजपासून दिल्लीच्या दिशेने वेगाने कूच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे 'चलो दिल्ली'चा नारा देत शेतकरी आंदोलनावर कायम असून आजपासून आंदोलन तीव्र करतील. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यातील बैठक पुन्हा एकदा निष्फळ झाली. (Photo Credit : PTI)
शेतकरी संघटनांना मोदी सरकारचा प्रस्ताव मंजूर नसल्याने त्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo Credit : PTI)
दिल्ली सीमेच्या दिशेने शेतकरी पुढे जात असल्याने पोलीस आणि प्रशासन अलर्टवर आहे. (Photo Credit : PTI)
शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)
शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारीपासून दिल्लीतील सटी सीमेवर आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. (Photo Credit : PTI)
प्रशासनाने मंगळवारी दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाजीपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)
मंगळवारी दिल्लीला जाणाऱ्या हरियाणातील सुमारे 50 शेतकऱ्यांना गुरुग्राम पोलिसांनी मानेसरमध्ये ताब्यात घेतलं. (Photo Credit : PTI)
पिकांसाठी किमान आधारभूत किंमत हमी देण्याच्या त्यांच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिले. (Photo Credit : PTI)
सरकारने शेतकऱ्यांच्या 10 मागण्या मान्य केल्या आहेत. तीन मागण्यांवर हे प्रकरण अडकले आहे. म्हणजेच किमान आधारभूत किंमत हमी कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन यावर एकमत होऊ शकले नाही. (Photo Credit : PTI)