Virat Kohli Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुस-यांदा बनले पालक, घरी आला छोटा राजकुमार!
क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आई-बाबा होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. (pc:anushkasharma/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखेर आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (pc:anushkasharma/ig)
विराट-अनुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव 'अकाय' (Akaay) असं ठेवलं आहे.(pc:anushkasharma/ig)
विराट-अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की,15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ 'अकाय'चं स्वागत केलं आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता. (pc:anushkasharma/ig)
अनुष्का-विराटच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांसह क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (pc:anushkasharma/ig)
दुसऱ्या प्रेग्नंसीबाबत विराट-अनुष्काने गोपनितया ठेवली होती. सप्टेंबर 2023 मध्ये अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची पहिली बातमी समोर आली होती. (pc:anushkasharma/ig)
अभिनेत्रीचे बेबी बंपदेखील दिसून आले. पण तरीदेखील विराट-अनुष्काने यासंदर्भात गोपनियता ठेवली. अखेर आज खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.(pc:anushkasharma/ig)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नबंधनात अडकले. इटलीतील टस्कनीमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. (pc:anushkasharma/ig)
कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत ते विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या तीन वर्षानंतर 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्काने वामिकाला (Vamika) जन्म दिला. आता विरुष्काने आपल्या दुसऱ्या बाळाचंदेखील स्वागत केलं आहे.(pc:anushkasharma/ig)
अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती क्रिकेटरचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB Devilliers) ट्वीट करत दिली होती. (pc:anushkasharma/ig)
पण नंतर त्याने आपलं विधान मागे घेत माफीनामा जाहीर केला. आपण दिलेली माहिती चुकीची असल्याचं त्याने म्हटलं. पण त्यानंतरही डिव्हिलियर्सने दिलेली डिलिव्हरीची बातमी खरी असल्याचं म्हटलं गेलं. (pc:anushkasharma/ig)