PHOTO : समृद्धी अपघात, पालकमंत्री भुमरेंकडून पाहणी; अपघाताची होणार चौकशी
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा झालेला अपघात एवढा भीषण होता की, 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकूण 23 जण यात जखमी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, अपघाताची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अपघातास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी अपघाताची माहिती पालकमंत्री भुमरे यांना दिली.
ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा नेमका अपघात कसा झाला, याबाबत देखील पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पालकमंत्री भुमरे यांना माहिती दिली.
यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते. सावे यांनी सुद्धा अपघातास्थळाची पाहणी केली.
विशेष म्हणजे सकाळीच घाटी रुग्णालयात भेट देऊन सावे यांच्याकडून जखमींची विचारपूस करण्यात आली. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, त्यानंतर पालकमंत्री भुमरे आणि मंत्री सावे यांनी अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.
तसेच या अपघाताची संपुर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. तसेच जो कोणी दोषी असेल त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे.