Maratha Reservation : 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या....'; औरंगाबाद शहरात कडकडीत बंद

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद बंदला शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत असून, महत्वाच्या बाजारपेठ बंद आहेत.

शहरातील आकाशवाणी ते क्रांती चौक, पैठण गेट, गुलगुंडी सर्व ठिकाणी पूर्णपणे बंद पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद शहरातील सर्वच मुख्य बाजारपेठा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आज सकाळपासूनचं शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून, सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
शहरातील गुलमंडी, निराला बाजार, मोंढा, पैठण गेट, सिटी चौक, खडकेश्वरसह अनेक भागात दुकाने बंद असल्याचे दिसून येत आहेत.
तसेच सिडको-हडको परिसरात देखील पूर्णपणे बंद असल्याचे चित्र असून, व्यापाऱ्यांनी बंदला पाठींबा दिला आहे.
तर काही भागात तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान शहरातील नेहमी वर्दळीचे ठिकाण आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.