Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ दीड लाख अर्ज, पाहा फोटो
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात आक्षेप आणि हरकती दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे आज विभागीय आयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणावर विरोधात आणि समर्थनात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने देखील आज विभागीय आयुक्त कार्यालयात नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
काही वेळेपूर्वी सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या कार्यालयातून नामांतराच्या समर्थनार्थ भरलेले दीड लाख अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यासाठी कार्यकर्ते घेऊन निघाले आहेत.
समर्थनार्थ भरलेले दीड लाख अर्ज वेगवेगळ्या तीन गाड्यामधून घेऊन जाणार असल्याची माहिती सकल हिंदू एकत्रीकरण समितीचे राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे.
यासाठी एक-एक हजारचे वेगवेगळे गठ्ठे तयार करण्यात आले असून, ज्यात एकूण दीड लाख लाख अर्ज असल्याची माहिती देखील जंजाळ यांनी दिली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात हे सर्व दीड लाख अर्ज दाखल करण्यात येत असून, सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने हे सर्व अर्ज भरून घेण्यात आले होते.
तसेच अजूनही नामांतराच्या समर्थनार्थ भरलेले अर्ज दाखल होत असून, त्यांचे नंबरीकरन ते देखील आजच्या आज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती जंजाळ यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नामांतराविरोधात आणि समर्थनार्थ भरलेले अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करता येणार आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे
सोबतच आजचा शेवटचा दिवस असल्याने अर्जांची संख्या देखील मोठी असणार आहे. त्यामुळे 25 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.