Shrikant Shinde : महाविकास आघाडीने घेतलेल्या बैठकांची आम्हाला चिंता नाही : श्रीकांत शिंदे
शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दौऱ्यात त्यांनी पन्हाळा येथे छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या नावाने जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, कुस्ती संकुल आणि मुलींसाठी सैनिकी शाळा बांधण्यासाठी निधीचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी शहरात आले होते.
शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीने घेतलेल्या बैठकांची आम्हाला चिंता नाही. आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमच्याकडे MVA बद्दल बोलायला वेळ नाही.
ते पुढे म्हणाले,कोल्हापूर हे अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते, त्यातील एक फुटबॉल आहे. खेळाडूंना चांगल्या स्टेडियमची गरज आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीने शहरात स्टेडियम बांधले जाईल याची ग्वाही देतो.
तसेच सुसज्ज कुस्ती संकुल बांधले जाईल असेही त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी इतिहासकार जयसिंगराव पवार यांचीही भेट घेतली.
खासदार शिंदे यांनी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली.
कोल्हापुरातील सर्किट बेंचसाठी 10 दिवसांत पालकमंत्र्यांसह संबंधित घटकांची मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
खासदार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी खंडपीठ कृती समितीने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.