PHOTO : पुरातन बारवेचा श्वास मोकळा करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार, पाहा फोटो
छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन शहराच्या मध्यभागी असलेल्या पातूनकर गल्लीमध्ये बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या भव्य दिव्य बारवेने आठशे वर्ष स्वतःचे अस्तित्व टिकवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पुरातन बारवेची झाडी झुडपे, काडी, कचरा आदीपासून सुटका करण्यासाठी तरुणांनी बारव स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
एक बाजूने पायऱ्या असलेली नंदा बारव, दोन बाजूने पायऱ्या अस लेली भद्रा बारव, तीन बाजूने पायऱ्या असलेली जया बारव तसेच चार बाजूने पायच्या असलेली विजया बारव अशी बारवांची ओळख असते.
आठशे वर्षांपूर्वी यादव कालखंडात जुन्या बिडकीन गावाच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गावाच्या मध्यभागी पातूनकर गल्लीत दोन बाजूंनी उतरण्यासाठी पायऱ्या असणाऱ्या भद्रा बारवेची निर्मिती करण्यात आली.
या बारवेमध्ये तीन सोपान म्हणजे टप्पे असून एका टप्प्यावर दगडी मंडपात शेषशाही विष्णू मूर्ती आहे. दगडी मंडपाच्या समोरच्या सोपानवर आसरा मातेचे ठाणे असून बारवेच्या तळाशी पाण्याची कुंडी आहे.
कधीकाळी गावाची तहान भागवलेली असताना काळाच्या ओघात ही बारव ग्रामस्थांकडून दुर्लक्षित झाली होती. काटेरी झाडे- झुडपे, काडी-कचरा, दगड-गोटे, घाण व पडझडीमुळे बारवेचा श्वास गुदमरत होता.
बारव नामशेष होण्याच्या मार्गावर असताना गावातील तरुणांनी बारव स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
पुरातन बारवेचा श्वास मोकळा करण्यासाठी तरुणाईची धडपड पाहता गावातील इतर ग्रामस्थ, सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.