...अखेर महानगरपालिकेच्या मुख्यालयात लागला 'छत्रपती संभाजीनगर'चा फलक, पाहा फोटो
शासनाच्या या निर्णयानंतर आता शहरात सरकारी कार्यालये, महापालिकेच्या इमारतींवरीलऔरंगाबादचे फलक बदलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान दोन दिवसांपूर्वी महापालिकेने प्रवेशव्दार व प्रशासकीय इमारतीवरील औरंगाबाद नावाचे फलक काढले होते.
त्यानंतर शनिवारी (25 मार्च रोजी) महानगरपालिकेच्या टप्पा तीनमधील प्रशासकीय इमारतीवर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावण्यात आला आहे.
मात्र महापालिका आयुक्त आणि महापौर यांचे दालन असलेल्या मुख्यालयाच्या इमारतीवरील औरंगाबाद काढले असून, नवीन नाव अजून लावण्यात आलेले नाही.
महापालिकेतील औरंगाबाद नावाचा फलक बदलून, त्याजागी छत्रपती संभाजीनगर असा फलक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
त्यानुसार ठराव घेत महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नामफलक बदलण्याचे आदेश दिले होते.
प्रवेशद्वार, मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा तीन इमारतीच्या नामफलकावरील औरंगाबाद हे नाव गुरुवारी काढून टाकण्यात आले.
त्यानंतर शनिवारी प्रशासकीय इमारतीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असे नामकरण करण्यात आले.
तसेच मुख्य इमारतीवरही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असे नाव लवकरच टाकले जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.