Chhatrapati Sambhaji Nagar : मोदी चोर है! छ. संभाजीनगर काँग्रेसकडून पोस्टरबाजी, पाहा फोटो
शहरातील महत्वाच्या बँकावर देखील 'मोदी चोर है' असे आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून 'मोदी चोर है' अशा आशयाचे पोस्टर शहरभरात लावण्यात आले असून, शहरातील सर्वच ममहत्वाच्या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
चौकीदार चोर हि नही, डरपोक भी है...हुकुमशाही पद्धतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध...निरव ललित मोदी चोर है (बोल्ड अक्षरात) असे लिहण्यात आले आहे.
तर डॉ. निलेश आंबेवाडीकर, विजय कांबळे, आकाश रगडे, मयूर साठे आणि अभिषेक शिंदे यांचे नाव निषेधकर्ते म्हणून या पोस्टरवर उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच शहरातील निराला बाजार, कॅनॉट प्लेस परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 200 पोस्टर लावण्यात आले आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या अनेक एसटी बसवर हे स्टीकर लावण्यात आलेले आहेत.