अजबच! दुचाकीला लॉक असल्याने चक्क टायर चोरून नेले, पाहा फोटो
यासाठी दुचाकीला वेगवेगळ्या पद्धतीने लॉक देखील लावण्यात येतात.यासाठी अनेकदा साखळी बांधून गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असल्याने, आपली दुचाकी चोरीला जाऊ नयेत म्हणून नागरिक वेगवेगळ्या उपाययोजना करतात.
नागरिकांनी केलेल्या उपाययोजनामुळे दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नाही. त्यामुळे चक्क दुचाकीचे दोन्ही चाकं चोरून नेले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवरील अल्पाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एका रुग्णाच्या नातवाईकाने आपली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्रमांक MH 20 CM 8825) रुग्णालयाच्या गेटसमोर उभी केली होती.
रुग्णालयाच्या समोर उभा असलेली दुचाकी काही अज्ञात चोरांनी चोरण्याचा प्रयत्न केला.
मात्र दुचाकीचा लॉक तुटत नसल्याने चोरांनी शक्कल लढवली आणि दुचाकीचे दोन्ही टायर खोलून नेले. तर दुचाकी जागेवरच सोडून दिली.
त्यामुळे दुचाकी नाही तर किमान तिचे पार्ट तरी घेऊन जाण्याची चोरट्यांच्या पद्धतीने दुचाकीस्वारांची चिंता वाढली आहे.
image 6