Bislery : बिस्लेरीला मिळाला नवा 'बॉस', कोण आहेत सीईओ जयंती चौहान?
Jayanti Chauhan To Lead Bisleri : मिनरल वॉटर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी बिस्लेरी कंपनीला नवा सीईओ मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा समूहासोबतचा करार रद्द झाल्यानंतर आता बिस्लेरी कंपनीला नवीन सीईओ मिळाल्या आहेत. जयंती चौहान यांच्याकडे आता बिस्लेरीची जबाबदारी असेल.
बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांची मुलगी जयंती चौहान (Jayanti Chauhan) आता बिस्लेरी कंपनीची प्रमुख असणार आहे.
जयंती चौहान यांच्याकडे आता बिस्लेरीची जबाबदारी असेल. टाटा समूहाची बिस्लेरी कंपनी खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु होती. मात्र आता हा करार रद्द झाला आहे.
बिस्लेरीचे चेअरमन रमेश चौहान यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे. रमेश चौहान यांनी सांगितलं की, आता आमची आम्ही कंपनी विकणार नाही. त्यांची मुलगी जयंती चौहान आता बिस्लेरीच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळेल
रमेश चौहान यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, त्यांची मुलगी जयंती चौहान व्यावसायिक टीमसोबत कंपनी चालवेल आणि आता आम्हाला आमचा व्यवसाय विकायचा नाही.
टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (TCPL) सोबत करार रद्द (Tata Consumer Withdraws Acquisition Plan) झाल्यानंतर आता कंपनीने जयंती यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
जयंती चौहान बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान यांची मुलगी आहे. जयंती चौहान या 42 वर्षांच्या आहेत.
जयंती चौहान सध्या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या कंपनीच्या उपाध्यक्षा (Vice Chairperson) आहेत. जयंती आता मुख्य कार्यकारी अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील बिस्लेरी कंपनीचा व्यवसाय सांभाळतील.
मीडिया रिपोर्टनुसार, बिस्लेरीचे चेअरमन आणि उद्योजक रमेश चौहान यांचं वय सध्या 82 वर्ष आहे. मागील काही दिवसांपासून वयोमानानुसार त्यांची प्रकृती बिघडलेली आहे.
त्याशिवाय, बिस्लेरी कंपनीला भविष्यात पुढे नेण्यासाठी, व्यवसाय विस्तारासाठी उत्तराधिकारीदेखील नाही. त्यांची मुली जयंती चौहान बिस्लेरी कंपनीच्या व्यवसायाबाबत फारशा उत्सुक नसल्याचं सांगितलं जातं होतं.
त्यामुळे बिस्लेरी कंपनी विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. रमेश चौहान यांनी एका मुलाखतीत टाटासह इतर काही कंपन्या बिस्लेरी खरेदी करण्यासाठी चर्चा करत असल्याचं सांगितलं होतं.
iमात्र, आता चेअरमन रमेश चौहान यांनी बिस्लेरी कंपनी विकण्याचा निर्णय मागे घेतला असून त्यांची मुलगी जयंती चौहान यांच्या खांद्यावर आता कंपनीची जबाबदारी असेल.