Photo : मराठवाड्यात केवळ 2 टक्के पंचनामे, संपाचा शेतकऱ्यांना फटका
मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले असून, आतापर्यंत फक्त 1 हजार 384 हेक्टरचे पंचनामे झाले आहे. (सर्व संग्रहित छायाचित्र)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 हजार 314 शेतकऱ्यांचे एकूण 7 हजार 762.50 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजून एकही पंचनामा झालेला नाही.
परभणी जिल्ह्यातील 4 हजार 500 शेतकऱ्यांचे एकूण 2 हजार 400 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र परभणीत देखील एकही पंचनामा झालेला नाही.
हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 286 शेतकऱ्यांचे एकूण 5 हजार 604 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तर यापैकी 310 हेक्टरचे पंचनामे झाले असून, ज्याची टक्केवारी 5.53 टक्के आहे.
सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील 19 हजार 899 शेतकऱ्यांचे एकूण 23 हजार 554 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. पण पंचनामे फक्त 698 हेक्टरवर पीकांचे झाले असून, त्याची टक्केवारी 2.96 आहेत.
बीड जिल्ह्यातील 21 हजार 459 शेतकऱ्यांचे एकूण 11 हजार 365 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तर बीड जिल्ह्यात देखील एकही पंचनामा झालेला नाही.
लातूर जिल्ह्यातील 16 हजार 842 शेतकऱ्यांचे एकूण 11 हजार 794 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे फक्त 3. 19 टक्के
तर जालना आणि धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शासकीय कर्मचारी संपावर गेले असल्याने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत.