Photo : नामांतराविरोधात आक्षेप दाखल करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, पाहा फोटो
नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 मार्चची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवघ्या तीन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला असताना समर्थनात आणि विरोधात हजारो अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळत आहे. यासाठी आवक-जावक विभागात मोठी गर्दी होत आहे.
तर नामांतराविरोधात आतापर्यंत 69 हजार आणि समर्थनात साडेचारशे अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या 35 वर्षांपासून औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणी होत होती. दरम्यान केंद्राने मंजुरी दिल्याने अखेर दोन्ही शहरांचे नावं बदलण्यात आली आहे.
विशेष म्हणजे रस्त्यावरील लढाई सोबतच आता कायदेशीर लढाई देखील दोन्ही बाजूने उभी केली जात आहे. याचाच भाग म्हणून नामांतराच्या विरोधात आणि समर्थनात विभागीय आयुक्त कार्यालयात अर्जांचा अक्षरशः पाऊस पडतोय.
आक्षेप अर्ज सादर करण्यासाठीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना नामांतराविरोधात आतापर्यंत 69 हजार आक्षेप आणि हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. तर समर्थनात साडेचारशे अर्ज आले आहेत.
विशेष म्हणजे एकाच दिवसात 24 हजार आक्षेपाचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाले आहे. तर नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात दाखल होणाऱ्या अर्जातून आपली भूमिका भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला जातोय.