Budget Session : विधानभवनात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री
धीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरु आहे. आजच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्यानं हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला.
विशेष म्हणजे दोन्ही नेते एकमेकांसोबत चर्चा करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. येत्या 25 तारखेला म्हणजे शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होती. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं . त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये फराकत झाली होती.
2019 नंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले होते.
दोन्ही पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
आज विधीमंडळात दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक वेगळे चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची एकत्र एन्ट्री झाल्यानं सगळ्यांच्या नजरा या दोन्ही नेत्यांकडे लागल्या होत्या
सभागृहात प्रवेश करेपर्यंत दोघेही एकमेकांशी चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.