Health Tips: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम; कॉफी पिण्याची 'ही' आहे योग्य वेळ
अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात बरेच लोक रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणं पसंद करतात. परंतु ब्लॅक कॉफी, कॉफी किंवा चहा रिकाम्या पिणं टाळलं पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकता. कॉफी पिणं शरीरासाठी चांगलं असतं, परंतु रिकाम्या पोटी कॉफी पिणं हे शरीरासाठी तितकंच धोकादायक असतं.
काही लोकांना ब्लॅक कॉफी खूप आवडते. ब्लॅक कॉफीमुळे कोणतंही नुकसान होत नाही, असं त्यांचं मत असतं. पण रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिण्याने शरीराचं बरंच नुकसान होतं.
आरोग्य तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
अनेक महिने रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने व्हिटॅमिन बी12 ची कमतरता निर्माण होऊ शकते.
एवढंच नाही तर कॅल्शियमची कमतरता देखील निर्माण होऊ शकते.
हे सर्व टाळण्यासाठी कॉफी रिकाम्या पोटी पिऊ नये, तसेच दिवसातून कमी प्रमाणात कॉफी प्यावी.
तुम्ही एका दिवसात 2 ते 3 कप कॉफी पिऊ शकता, परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त कॉफी प्यायली तर भविष्यात तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
नाश्ता केल्यावर किंवा जेवणानंतर अर्धा तासाने कॉफी पिणं योग्य असतं.