Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं?, थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून डेमो
मराठवाड्यातील आठही जिल्यात मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसात 75 पेक्षा जास्त मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, कुणबी जात प्रमाणपत्र मिळतात कसे, कशा पद्धतीने हे सगळं काम चालतंय, तुम्हाला कोणते कागदपत्रे सोबत न्यावे लागणार, शासनाचे कोणते कागदपत्र तुमच्या फायद्याचे ठरणार याबाबतचा आढावा 'एबीपी माझा'ने घेतला आहे.
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 1967 च्या अगोदरचा कुठलाही पुरावा आवश्यक, ज्यावर कुणबी असल्याची नोंद असायला हवी.
या पुराव्यात खासरा पत्र, पाहणी पत्र, कुळ नोंद वही, नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना न. 1 हक्कनोंद पत्रक, सातबारा उतारा, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम नोंद वही, आदी कुणबी नोंद असलेले कागद, मोडी, उर्दू, भाषेत असलेले दस्तावेज भाषांतर करून अटेस्टेड करून घेणे
सोबतच अर्ज करतांना 100 रुपयांच्या बॉण्डवर वंशावळ प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याचं गरजेच असेल.
अर्ज करणारा व लाभार्थींचे टिसी, आधार कार्ड असे कागदपत्र देखील असायला पाहिजे.
वरील सर्व कागदपत्र घेऊन आपले सरकार केंद्र, पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अर्ज केल्यानंतर सदरील अर्ज त्या-त्या तहसील, उपविभागीय अधिकारी स्तरावर या सर्व कागदपत्रांची छाननी केली जात आहे.
उमेदवाराने ज्या विभागाची कुणबी असलेली नोंद कागदपत्र दिले आहे, त्या विभागाकडून सरकारी पातळीवर हे कागदपत्र खरे असल्याचा निश्चित केले जाणार.
सर्व कागदपत्र व्यवस्थित असले की, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून त्यांच्या स्तरावर कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार.