PHOTO : तिरडी बांधली, खांदेकरीही आले; मराठा आरक्षणासाठी निघाली 'सरकारची अंत्ययात्रा'
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आजी माजी आमदार, खासदारसह महाराष्ट्र सरकारचा तिरडी गावामध्ये काढुन अंत्यसंस्कार करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया वेळी गावातील नवतरुणासह ग्रामस्थांनी तिरडी बांधून चार खांदेकरी व पाचवा पाणोड्याअशी हूबेहूब अंत्ययात्रा काढली.
यावेळी मराठा आमदार, खासदार यांच्या नावाने बोंबाबोब करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला, तसेच वेशी मधुन ही अंत्ययात्रा काढण्यात आली.
खामगाव गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासुन स्थानिक स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढून सरकारचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधीनी यांना श्रद्धांजली वाहत, येणाऱ्या काळात तात्काळ आरक्षण न दिल्यास तीव्र अंदोलन करण्याचा संकल्प करण्यात केला.
याचप्रमाणे पैठण तालुक्यातील लोहगाव येथे देखील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे.
तर, छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील करमाड येथे देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला.