World Cup 2023: नेदरलँडचे खेळाडू प्रोफेशनल क्रिकेटर नाहीत; कुणी इंजिनीअर, तर कुणी बिझनेसमॅन
नेदरलँड संघातील भारतीय वंशाचा खेळाडू तेजा निदामनुरु 2018 पर्यंत न्यूझीलंडमध्ये साधारण क्रिकेट खेळत होता. प्रोफेशनली खेळण्याची संधी न मिळाल्याने त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तो नेदरलँडमध्ये कॉर्पोरेट नोकरी करू लागला, तरीही त्यासोबत तो क्रिकेट देखील खेळत राहिला. यानंतर 2022 मध्ये त्याला पहिल्यांदा नेदरलँड संघात प्रवेश मिळाला. असं असताना तो अजूनही कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेदरलँड्सनं बांगलादेशचा 87 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसरा ऐतिहासिक विजय साजरा केला.
पॉल वॅन मेकरननं 23 धावांत चार, तर बास डे लेडेनं 25 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
नेदरलँड संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स हा इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. क्रिकेट खेळण्यासोबतच त्याने दीर्घकाळ या क्षेत्रात नोकरी देखील केली आहे.
या विश्वचषकात नेदरलँड्सनं बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला होता. त्याच नेदरलँड्सनं शकिब अल हसनच्या आता बांगलादेशलाही हरवण्याची कामगिरी बजावली आहे.
नेदरलँड्सनं बांगलादेशला विजयासाठी 50 षटकांत 230 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण नेदरलँड्सच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशनं अवघ्या 142 धावांत सपशेल लोटांगण घातलं.
त्याआधी, नेदरलँड्सच्या स्कॉट एडवर्डसनं कर्णधारास साजेशी खेळी केली. त्यानं 89 चेंडूंत सहा चौकारांसह 68 धावांची खेळी उभारली.