PHOTO: वंदे भारत एक्सप्रेसने देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रवास
आज जालना रेल्वे स्थानकावरून जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.यावेळी जालना येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, याच रेल्वेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास केला.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार हरीभाऊ बागडे,प्रशांत बंब, संजय सिरसाट उपस्थित होते.
जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात रेल्वेचे शालेय विध्यार्थी, रेल्वे प्रवाशी, स्थानिक नागरिकांनीही उत्साहात स्वागत केले.
मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशासाठी मुंबई येथे जाण्यासाठी ही रेल्वेची जलद सोय उपलब्ध झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.
विशेष म्हणजे जालना-मुंबई मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातील सातवी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आहे.
तर, नव्या वर्षात ही गाडी एक जानेवारीपासून गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल.
मुंबई-जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे.
ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकातून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी बारा वाजता पोहोचेल.