छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्तांचा वाढदिवस कर्मचाऱ्यांकडून थाटात साजरा, शहरात 10 दिवस पाणी नसताना वाढदिवसावर अडीच लाख खर्च केल्याची चर्चा
संभाजीनगर शहराच्या अनेक भागांमध्ये दहा-दहा दिवस पाणी येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच शहराचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा वाढदिवस मात्र अतिशय थाटात साजरा करण्यात आला.
यासाठी मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जवळपास अडीच लाखांची वर्गणी देखील काढल्याची देखील चर्चा आहे.
स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट, त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा, शानदार फेटे, सुंदर रांगोळी, जेवणासाठी उत्तम पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा असं दृश्यं काल संभाजीनगरमध्ये रंगलं होतं.
वाढदिवसाचं नियोजन करण्यासाठी अधिकारी अतिशय तत्पर होते, असं कळतंय.
हीच तत्परता जर शहराच्या समस्या सोडवण्यात दाखवली, तर काही महिन्यांत संभाजीनगर शहराचा चेहरामोहराच बदलून जाईल, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करतायेत.
छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.
महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा करून आयुक्तांचा हा शाही वाढदिवस साजरा केला असल्याचं बोललं जात आहे.
स्मार्ट सिटी कार्यालयात रांगोळी काढण्यात आली. आयुक्तांसाठी विशेष केकची सोय करण्यात आली
काय तर आयुक्त बसतात त्या कार्यालयात फुगे लावण्यात आले, टेबलावर बुके ठेवून कार्यालय सजवण्यात आले. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या वाढदिवसाची शहरात दिवसभर चर्चा होती