Is Coffee And Tea Bad For Kids: तुम्ही देखील देता का तुमच्या मुलांना चहा आणि कॉफी? जाणून घ्या यामुळे होणाऱ्या परिणांमांबद्दल
त्यामुळे हल्ली प्रत्येक घरामध्ये मुलांना चहा कॉफी घेण्याची सवय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु चहा कॉफी घेतल्याने तुमच्या मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर.
जर लहान मुलं चहा कॉफीचं सेवन करत असतील तर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच त्यांच्या पचनक्रियेवर देखील परिणाम होऊ शकतो.
चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. त्यामुळे लहान मुलांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊ शकते. तसेच मुलांची हाडे देखील कमकुवत होऊ शकतात.
चहा आणि कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण असते. त्यामुळे जास्त झोप येत नाही.
जर मुलं चहा आणि कॉफीचे सेवन करत असतील तर त्यांची झोप पूर्ण होऊ शकणार नाही. तसेच त्यांच्या स्वभावात देखील बदल होऊ शकतो.
गरजेपेक्षा जास्त चहा आणि कॉफीचे सेवन मुलांनी केल्यास त्यांना पित्ताचा देखील त्रास होऊ शकतो.
तसेच त्यांना जास्त भूक देखील लागणार नाही. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेली पोषक तत्त्वे देखील मिळण्यास अडचण निर्माण होईल.
यामुळे मुलांना पचनक्रियेचा देखील त्रास होऊ शकतो.