Buldhana Accident: बुलडाणा अपघातस्थळाकडे निघालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर तपासणी
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहचले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर विमानतळावरून चारचाकी गाडीने ते बुलढाण्याकडे रवाना झाले आहे.
विशेष म्हणजे हा सर्व प्रवास मुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरून करणार असल्याने त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संभाजीनगरच्या विमानतळावर आरटीओकडून तपासणी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तपासणी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. ज्यात वाहनाची हवा, किलोमीटर, ताफ्यातील वाहनांची परिस्थिती या सर्वांची चौकशी करण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांनाच्या इंजन आणि इतर गोष्टींची देखील यावेळी तपासणी करण्यात आली.
सर्व वाहनांची तपासणी केल्यावर आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल दलेल्या वाहनांनाच ताफ्यात प्रवेश देण्यात आला.
यावेळी एका गाडीचं किलोमीटर अधिक झाल्याने ती गाडी ताफ्यात वापरता येणार नसल्याचे सांगत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी 'रेड सिग्नल' दिल्याने ती गाडी बाहेर काढावी लागली.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.